लाडकी बहिण योजनेचे Application व्यवस्थित सुरु अशा पद्धतीने भरा फॉर्म | Ladki Bahini Yojana Registration

Ladki Bahini Yojana Registration नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना अनेक महिलांना एप्लीकेशन मध्ये विविध प्रकारचे प्रॉब्लेम येत असल्यामुळे सर्व महिला चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हे ॲप्लिकेशन सुरळीत कधी चालणार याबाबत महिलांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. एप्लीकेशन मध्ये सर्वच येणारे प्रॉब्लेम तसेच डॉक्युमेंट्स सबमिट न होणे यांसारख्या अडचणीमुळे आपला फॉर्म भरायचा राहतोय की काय असे महिलांच्या मनात येत आहे परंतु आता तुम्ही या पद्धतीने सविस्तर प्रक्रिया करून तुमचा अर्ज एप्लीकेशन मधून लगेच सबमिट करू शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व पात्र महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दिनांक 01 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली असून यासाठी तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचे अर्ज सबमिट करू शकता अथवा तुमच्या घरात बसून मोबाईल एप्लीकेशन द्वारे तुम्ही या योजनेसाठी कोणतेही शुल्क न भरता तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात.

यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशन ला गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचे आहे. हे ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यायची आहे. मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे तुम्ही तुमचे नाव, पत्ता यांसारखी माहिती एप्लीकेशन मध्ये अपडेट करून तुमचे प्रोफाईल देखील अपडेट करू शकणार आहात आणि अपडेट झाल्यानंतर तुम्हाला योजनांची यादी वर क्लिक करायचे आहे.

यामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय निवडून तुम्हाला पुढे जायचे आहे यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठीचा फॉर्म ओपन होणार आहे या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे त्याचबरोबर खाली देण्यात आलेल्या बँकेचा तपशील देखील योग्यरीत्या भरायचा आहे.Ladki Bahini Yojana Registration

यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक असणारे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहेत हे अपलोड करत असताना कागदपत्रांच्या फोटो योग्यरीत्या काढलेला असणे आवश्यक असणार आहे.कागदपत्रांसाठी तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला/रेशन कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला
  • बँक पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला/पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • हमीपत्र

वरील सर्व कागदपत्रांचे व्यवस्थित फोटो काढायचे आहेत आणि अपलोड करताना फोटोची साईज 01 MB पेक्षा कमी असावी याची खात्री करायची आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मित्रांनो सध्या एप्लिकेशन अगदी व्यवस्थित चालत आहे त्यामुळे तुम्ही लगेच तुमचे अर्ज करू शकणार आहात.आणि तरीही अर्ज सबमिट होताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अप्लिकेशन Uninstall करून पुन्हा डाऊनलोड करायचे आहे आणि असे केल्यास तुम्ही सहज तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात.एवढे करूनही तुमचे अर्ज सबमिट होत नसल्यास तुम्ही वाट पहायची आहे आणि Application मधील Cache पूर्ण क्लिअर करायचा आहे असे केल्यास तुम्हाला येणाऱ्या सर्व अडचणी सॉल्व होणार आहेत.

खालील विडीओ पाहून त्यानुसार तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत.Ladki Bahini Yojana Registration

लाडकी बहिण योजना नवीन App डाऊनलोड कराक्लिक करा
योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठीक्लिक करा
Ladki Bahini Yojana Registration

Leave a Comment