सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरीच्या सुवर्णसंधी लगेच पाठवा तुमचे अर्ज | GP Sahkari Bank Bharti 2024

GP Sahkari Bank Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच राज्यातील सहकारी बँक लि. अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन (इमेल) पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ३१ जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

जी.पी.पारसिक सहकारी बँक भरती २०२४

जी.पी.पारसिक सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू असून तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत ई-मेल ऍड्रेस वर तुमचा बायोडाटा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.

मित्रांनो सदरील भरतीच्या नमूद केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरती अंतर्गत जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) या पदासाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत आणि त्यामुळेच या अत्यंत महत्त्वाच्या पदांसाठी आकर्षक वेतनश्रेणी देखील उमेदवारांना मिळणार आहे.

जी.पी.पारसिक सहकारी बँक भरती Apply Online :

सदरील भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी दिली जाणार आहे त्यामुळे यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही सबमिट केलेल्या अर्जांची छाननी करून त्यामधून पात्र ठरणाऱ्या अर्जांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे.

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास जनरल मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा सोबत उमेदवाराने एमबीए अथवा सीए/ सीएस/ आयसी डब्ल्यूए यांपैकी कोर्स असावा. डेप्युटी जनरल मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा सोबत उमेदवाराने एमबीए अथवा सीए/ सीएस/ आयसी डब्ल्यूए यांपैकी कोर्स असावा. मॅनेजर ( क्रेडिट आणि अकाउंट्स) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार सीए परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.GP Sahkari Bank Bharti 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पाठविण्यासाठी इमेल[email protected]

अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२४

भरती अधिकृत जाहिरात pdfक्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा
GP Sahkari Bank Bharti 2024

Leave a Comment