PMC Bharti 2024 मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठीच पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 :
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये प्रशिक्षक या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 12 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.
PMC अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
Pune Mahanagarpalika Recruitement 2024 :
भरतीचे नाव – पुणे महानगरपालिका भरती 2024
विभाग – महानगरपालिका विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – प्रशिक्षक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पुणे,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
पदसंख्या – 12
अर्ज शुल्क – नाही
वेतनश्रेणी – नियमाप्रमाणे
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 16 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एस.एम.जोशी हॉल,५८२ रस्ता पेठ,टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी,पुणे ११
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.PMC Bharti 2024
