PNB Bank Bharti 2024 पंजाब नॅशनल बँक अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.या भरतीमध्ये आकर्षक वेतनश्रेणी आणि सरकारी बँकेत नोकरीच्या संधी मिळणार असल्याने लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
पंजाब नॅशनल बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात देखील राबवली जात आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 जुलै 2024 पर्यंतची मुदत आहे. भरती चा अर्ज करण्याची लिंक, जाहिरात, पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बँक भरती २०२४ अधिकृत जाहिरात :
PNB अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.PNB Bank Bharti 2024
या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आणि एकूण 2700 रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसलेले उमेदवार देखील या भरतीसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत.(PNB Recruitement 2024)
पंजाब नॅशनल बँक भरती २०२४ शैक्षणिक पात्रता व अर्ज प्रक्रिया :
भरती नाव – पंजाब नॅशनल बँक भरती 2024
विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण राज्यात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
पदसंख्या – २७०० (महाराष्ट्र साठी १४५ जागा)
अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी ₹ 800 शुल्क असणार आहे.
- मागास व राखीव प्रवर्गासाठी ₹ 600 शुल्क असणार आहे.
- अपंग व महिला प्रवर्ग ₹ ४०० शुल्क आवश्यक
वेतनश्रेणी – Rs.15000/- ते 17000/- रुपये महिना
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 14 जुलै 2024
निवड प्रक्रिया – परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.PNB Bank Bharti 2024
